Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

63 वर्षांपासून महाराष्ट्रातून एक गाव गायब?

63 वर्षांपासून महाराष्ट्रातून एक गाव गायब?



नांदेड : खरा पंचनामा

नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी
अधिवेशन सुरू आहे. शेतकरी, कामगार, कर्मचारी आणि तरुण बेरोजगारांच्या प्रश्नावरून विरोधक राज्य सरकारची कोंडी करत आहेत. विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी होत आहे. विधिमंडळाच्या अशा तापलेल्या वातावरणात एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे महाराष्ट्रातील एक गाव चोरीला गेले आहे.

नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील हे गाव आहे. या गावाचे नाव वाघदरी आहे. तेलंगण सीमेला लागून महाराष्ट्राच्या हद्दीत हे गाव आहे. प्रांतवार रचनेनंतर हे गाव आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आले. महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन 63 वर्षे झाली. पण हे गाव अजूनही राज्याच्या नकाशावर आलेले नाही. विशेष म्हणजे महसूल विभागाकडेही या गावाची कुठलीही माहिती नाही.

राज्याच्या नकाशावर आणि महसूल विभागात गावाची नोंद नसल्याने हे गाव चोरीला गेले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाघदरी गावातील ग्रामस्थांकडे मतदान कार्ड आणि आधार कार्डही आहे. पण गावातील जवळपास साडेचार हजार हेक्टर शेतजमीनीची नोंद महसूल विभागाकडे नसल्याने कुणाकडेच जमिनीचा सातबारा नाही. सातबारा नसल्याने शेतकऱ्यांना पीकविमासह अनुदानाच्या कुठल्याही योजनांचा लाभ मिळत नाही.

सीमा भागात हे गाव असल्याने तिथे सुविधाही नाहीत. गावात जाण्यासाठी रस्ताही नाही. वाघदरीतील गावकऱ्यांना सात किलोमीटर पायपीट करावी लागते. जीव मुठीत घेऊन जंगलातून जावे लागते. महसुली नोंद करण्यासाठी वाघदरीचे गावकरी कित्येक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. पण प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. तर गावाची आकार बंदी आणि जमिनीची मोजणी करण्यात येत आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महसुली नोंदीसाठी प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.