800 कोटींची कामे कशी मंजूर केली?
भाजप-शिंदे गटाचा अजित पवारांविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा
पुणे : खरा पंचनामा
पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये आता नव्या वादाचे फटाके फुटण्याची चिन्हे आहेत. राज्याच्या सरकारमध्ये महायुतीत भाजप-शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्रित सत्तेत आहेत. मात्र नियोजन समितीत नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
अजित पवारांवर भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांचा आक्षेप आहे. यामुळे आता जिल्हा नियोजन समितीत अजित पवार गटाला भाजप आणि शिवसेनेकडूनच विरोध होताना दिसत आहे.
जिल्हा नियोजन समितीचे इतिवृत्त नसतानाही 800 कोटींची कामे मंजूर झाली आहेत. ही 800 कोटींची कामे रद्द करा, अन्यथा न्यायालयात जाणार, असा इशारा भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी अजित पवारांना दिला आहे. यामुळे नियोजन समितीच्या कारणावरुन आता अजित पवार गट एकटा पडल्याचे दिसत आहे. यामुळे आता अजित पवारांपुढे मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्हा नियोजनसमितीतील सदस्यांनीच पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांवर आक्षेप घेतले आहे. सदस्यांकडून एक निवदेन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहे. भाजप आणि शिंदे गटातील जिल्हा नियोजन समितीवरील सदस्यांनी हा आक्षेप घेतला आहे. 800 कोटींच्या कामाचे इतिवृत्त भाजप आणि शिंदे गटातल्या सदस्यांना देण्यात आले नव्हते, असा आक्षेप सदस्यांनी घेतला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.