Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निकालापूर्वी रिसॉर्ट तयार! हायकमांडने सांगितले तर पाच राज्याच्या आमदारांना सांभाळेन

निकालापूर्वी रिसॉर्ट तयार! हायकमांडने सांगितले तर पाच राज्याच्या आमदारांना सांभाळेन



बंगलुरू : खरा पंचनामा

देशात गेल्या काही दिवसांपासून पाच राज्याच्या निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे. रविवारी ३ डिसेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल समोर येणार आहेत. दरम्यान, काल पाच राज्यातील निकालांचे एक्झिट पोल समोर आले आहेत.

या पोलने आता राजकीय पक्षांचा संभ्रम वाढवला आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेश या दोन मोठ्या राज्या भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत दाखवली आहे. यामुळे आता सर्वांचे लक्ष मध्य प्रदेश आणि राजस्थानसारख्या राज्यांतील अपक्ष आणि प्रादेशिक पक्षांच्या आमदारांकडे असेल. त्यामुळे प्रत्येक पक्ष आमदारांना सांभाळण्याची तयारी करत आहेत. काँग्रेसमध्येही तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे.

यावर काँग्रेसचे नेते कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले, मी आमदारांना सांभाळायला तयार आहे. पक्षाच्या हाय कमांडने आदेश दिल्यास ते पाच राज्यांतील आमदारांना हाताळण्यास तयार आहे. हायकमांडने विचारले तर मी त्या ५ राज्यातील आमदारांना सांभाळायला तयार आहे, असंही शिवकुमार म्हणाले.

एक्झिट पोलने सर्वच पक्षांचा गोंधळ वाढवला. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत होऊ शकते, असे एक्झिट पोल दाखवले आहे, तर दोन्ही राज्यांमध्ये सत्ताधारी काँग्रेसची भाजपवर थोडीशी आघाडी आहे. आजपर्यंत, अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजपला पूर्ण बहुमत मिळत असल्याचं दिसत असताना, बहुतांश राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये नेट-टू-नेट लढत पाहायला मिळत आहे. अशीच काहीशी परिस्थिती राजस्थानमध्येही पाहायला मिळत आहे. जिथे काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. छत्तीसगडमधील एक्झिट पोलमध्ये काँग्रेसचा विजय होत असला तरी बहुतांश पोलमध्ये भाजप आणि काँग्रेसमधील फरक खूपच कमी आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.