Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चारित्र्याच्या संशयातून दोरीने पत्नीचा गळा आवळला सांगलीत पतीवर गुन्हा दाखल

चारित्र्याच्या संशयातून दोरीने पत्नीचा गळा आवळला
सांगलीत पतीवर गुन्हा दाखल



सांगली : खरा पंचनामा

शहरातील गावभाग परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पती विरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमित अशोक घोडावत (वय ३७, रा. खिलारेवाडा, गावभाग, सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुमितची पत्नी पूनम यांनी  फिर्याद दिली आहे.

संशयित सुमित हा पत्नीसह गावभागातील खिलारेवाडा येथे राहण्यास आहे. मागील काही दिवसांपासून सुमित पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वाद घालत होता. फिर्यादी पूनम या घरातील बेडरूममध्ये झोपल्या असता संशयिताने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच नायलॉनच्या दोरीने पूनम यांचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

परंतु यावेळी झालेल्या झटापटीत पूनम यांनी स्वतःची सुटका करून घेतली. याबाबत पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार संशयित सुमित याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.