Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लोकसभेच्या 'या' ४ जागा लढवणारच! जागावाटपावर अजित पवारांनी मौन सोडलं

लोकसभेच्या 'या' ४ जागा लढवणारच! 
जागावाटपावर अजित पवारांनी मौन सोडलं



कर्जत : खरा पंचनामा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत मीडिया आणि पेपरमध्ये येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा सुरू झालीय. परंतु ५ राज्यांच्या निवडणूक निकालानंतर पुन्हा चर्चा होईल.

आपण आपल्याकडे असणाऱ्या ४ जागा लढवणारच आहोत त्यासोबत अन्य जागांवरही निवडणूक लढवू असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केला.

कर्जत येथील चिंतन शिबिरात अजित पवार म्हणाले की, लोकसभेत निवडणूक झाल्यानंतर एनडीएचे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावे यासाठी आपल्याला काम करायचे आहे. जास्तीत जास्त खासदार महाराष्ट्रातून एनडीएच्या विचारांचे निवडून आणण्यासाठी माझ्यासह सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहे. आता आपल्याला बारामती, शिरुर, सातारा आणि रायगड या लढवणारच आहोत. पण त्यासोबतच इतर काही जागा ज्या उबाठा गटाकडं आहे जिथे राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. तिथे एकनाथ शिंदे आणि भाजपासोबत चर्चा करून काही जागा लढवायच्या आहेत. पेपर आणि मीडियाला बातम्या येतील लगेच त्यावर विश्वास ठेऊ नका. अमित शाह, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झालीय. जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा सुरू झालीय. ५ राज्यांच्या निकालानंतर पुन्हा बैठक होईल. मतदारसंघातील ताकद पाहून एनडीएच्या सर्व घटकांना सोबत घेत चांद्यापासून बांद्यापर्यंत लोकसभेच्या निवडणुकीचं काम करायचे आहे. आपल्याला वेगवेगळी बरीच कामे आहेत असं त्यांनी सांगितले.

तसेच २ दिवसांपासून पक्षाचे अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे विचारमंथन होतंय. राज्यातील ३६ जिल्ह्यातील सहकारी, वडिलधाऱ्यांनी, जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी जो भाग घेतला त्याबद्दल मी मनापासून तुमचे अभिनंदन करतो. राष्ट्रवादीचं हे शिबीर ४००-५०० लोकांपुरते मर्यादित असल्याने अनेकांना इच्छा असूनही येता आले नाही. कार्यकर्ते असले की संघटना मजबूत होते. तो संघटनेचा कणा आहे. आज जरी मर्यादित सहकाऱ्यांच्या उपस्थितीत शिबीर घेतले असले तरी आपल्याकडे वेळ कमी आहे. माझ्या अंदाजानुसार मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल असं अजित पवारांनी म्हटलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.