Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबईवरून कोल्हापूरला जाणाऱ्या खासगी बसचा अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

मुंबईवरून कोल्हापूरला जाणाऱ्या खासगी बसचा अपघात; चालकाचा जागीच मृत्यू 



रायगड : खरा पंचनामा

रायगडच्या खोपोली हद्दीत भीषण अपघात झाला आहे. मुंबईवरून कोल्हापूरला जाणाऱ्या खासगी बसला अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात बसचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दहा प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे लेनवर झाला आहे. ही खासगी बस वैभव ट्रॅव्हल्स कंपनीची होती. अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. खासगी बसच्या या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत रेस्क्यू टीम वाहतूक पोलीस बोरघाट, खोपोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी, डेल्टा फोर्सचे जवान, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान, लोकमान्य हॉस्पिटलच्या अॅम्बुलन्स, तसंच अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या टीमने घटनास्थळी जात मदत केली.

या अपघातात दहा प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. या जखमींना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केलं. तर या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बस चालकाला
खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.