Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गोकुळनगरमधील खुनप्रकरणी गुंड लखन इसरडेला अटक सहा दिवस पोलिस कोठडी

गोकुळनगरमधील खुनप्रकरणी गुंड लखन इसरडेला अटक
सहा दिवस पोलिस कोठडी



सांगली : खरा पंचनामा

शहरातील गोकुळनगरमध्ये विनोद इंगळे याचा खून केल्याप्रकरणी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करण्यात आली. या खून प्रकरणी यापूर्वी ६ जनाना अटक करण्यात आली आहे. त्याला ६ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती विश्रामबागचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.

लखन पंडित इसरडे (३३, रा. टिंबर एरिया, सांगली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यापुर्वी कृष्णा उर्फ मुदक्या कुटण्णाप्पा कांबळे (वय २१, रा. दसरा चौक, उत्तर शिवाजीनगर, सांगली), राकेश शामराव कांबळे (वय २६, रा. स्वस्तिक काट्याजवळ, न्यू टिंबर एरिया, सांगली) आणि नारायण सुरेश पवार (वय २९, रा. माकडवाले गल्ली, उत्तर शिवाजीनगर, सांगली) यांना अटक करण्यात आली होती.  

मृत विनोद इंगळे हा टिंबर एरियातील गोकुळनगर परिसरातील संजयगांधी झोपडपट्टी येथे राहत होता. विनोद आणि त्याचा मित्र हणमंत गोल्हार दोघे घटनेदिवशी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गोकुळनगर येथील गल्ली नंबर एक येथे चौकात गप्पा मारत थांबले होते. यावेळी हल्लेखोरांनी हणमंत गोल्हार याचा खून करण्याच्या उद्देशाने त्याच्या मानेवर कोयत्याने वार केला. यावेळी इंगळे हा मध्यस्तीसाठी गेला असता हल्लेखोरांनी चाकूने त्याच्यावर देखील कोयत्याने वार केले. इंगळे आणि गोल्हार हे दोघेजण रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संशयितांनी तेथून पळ काढला होता. संशयीतांनी पूर्ववैमनस्य आणि अनैतिक संबंधाच्या संशयावरुन खून केल्याची कबुली पोलिस तपासात दिली होती. 

लखन इसरडे हा संशयित पसार होता. त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. आज सोमवारी मार्केट यार्ड परिसरात त्याला अटक करण्यात आली. सहायक निरीक्षक एस. पी. वाघमारे तपास करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.