Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

प्रभाग दहामधील काही मतदारांची नावे वगळली माजी नगरसेवक प्रकाश मुळके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्रभाग दहामधील काही मतदारांची नावे वगळली
माजी नगरसेवक प्रकाश मुळके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन



सांगली : खरा पंचनामा

सांगलीतील प्रभाग क्र. दहामधील शेकडो नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. ती नावे अन्य प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. ही नावे कोणत्या कारणाने वगळली याची सखोल चौकशी करण्याची मागणी कॅंग्रेसचे माजी नगरसेवक प्रकाश मुळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

मुळके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र. दहाची मतदार यादी पाहिल्यानंतर गत निवडणुकीत असणारी या प्रभागातील सुमारे दोनशे ते अडीचशे नावे वगळण्यात आल्याचे दिसून येते. ती नावे अन्य प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. संगणक प्रणालीमुळे प्रभाग क्र. दहामधील मतदारांची नावे अन्य प्रभागात गेली आहेत का याची चौकशी करण्यात यावी. तसेच अन्य कोणाच्या हस्तक्षेपामुळे ही नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत का याची सखोल चौकशी करून यातील दोषींवर कारवाई करावी. तसेच चौकशीनंतर वगळण्यात आलेली मतदारांची नावे पुन्हा प्रभाग क्र. दहाच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात यावी अशी मागणीही मुळके यांनी केली आहे. 

यावेळी संभाजी मुळीक, आण्णाप्पा शिंदे, सागर दवे, देवा पवार, ओंकार जाधव, कैलास मुळके, शेखर पवार आदी उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.