Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कवठेमहांकाळच्या डाॅक्टरचा मौजे वडगावमध्ये संशयास्पद मृत्यू! सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

कवठेमहांकाळच्या डाॅक्टरचा मौजे वडगावमध्ये संशयास्पद मृत्यू!
सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला



कोल्हापूर : खरा पंचनामा

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील डाॅक्टरचा मौजे वडगाव येथे संशयास्पद मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. वडगाव येथील पाझर तलावाजवळ झाडीत गळफास लावलेल्या स्थितीत सडलेल्या आवस्थेत मृतदेह आढळून आला. डॉक्टरने आत्महत्या केली का त्याचा घातपात झाला हे स्पष्ट झालेले नाही.
    
डाॅ. संतोष जगन्नाथ ढोले (वय ४१, रा. धुळगाव, ता. कवठेमहांकाळ,
 जि. सांगली) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील पाझर तलावाशेजारी असणाऱ्या झाडास गळफास लावून लटकणारा मृतदेह  जळण आणण्यासाठी गेलेल्या महिलांना दिसला. त्यांनी याची माहिती ग्रामस्थाना तसेच पोलिस पाटील याना दिली. 

याबाबत शिरोली एमआईडीसी पोलिसांना या बाबतची माहिती दिली. पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरु केला. ढोले यांच्याजवळ  आधार कार्ड, इस्लामपुर येथील धन्वंतरी हेल्थ केअर सेंटरचे ओळखपत्रे  सापडले. पोलिसांच्या चौकशीत डाॅ. ढोले गेली दहा वर्षे घरच्यांपासून वेगळे राहत असल्याचे समजले. ढोले याने आत्महत्या केली की त्याचा घातपात करण्यात आला आहे याबाबत पोलिस तपास करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.