Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मराठा समाजाच्या विरोधानंतर अजित पवारांचा संभाजीनगर दौरा रद्द

मराठा समाजाच्या विरोधानंतर अजित पवारांचा संभाजीनगर दौरा रद्द



छत्रपती संभाजी नगर : खरा पंचनामा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संभाजीनगर दौरा रद्द करण्यात आला आहे. मराठा समाजाने अजित पवार यांच्या संभाजीनगर दौऱ्याला विरोध केला होता. पोलिसांनी अनेक मराठा कार्यकर्त्यांना देखील अटक देखील केली होती.

अजित पवार हे आज दिवसभर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन सकाळी १०:३० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र अजित पवार यांनी वेळेवर दौरा रद्द केला आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

या संमेलनाला अजित पवारांनी येऊ नये म्हणून सकल मराठा समाजाने आवाहन केले होते. त्यामुळे या समलेनाच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ होण्याची चिन्हे होती. अजित पवार हे सकाळी 10 वाजता हेलिकॉप्टरने दाखल होणार होते. संभाजीनगर जिल्ह्याची आढावा बैठक देखील अजित पवार घेणार होते. मात्र हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगत अजित पवार यांनी दौरा रद्द केला आहे. अजित पवारांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अजित पवारांच्या दौऱ्याला विरोध करण्याचं पत्र त्यांनी दिलं होतं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.