Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ललित पाटील पलायन प्रकरणी आणखी दोन पोलीस बडतर्फ

ललित पाटील पलायन प्रकरणी आणखी दोन पोलीस बडतर्फ



पुणे : खरा पंचनामा

ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणी पुणे पोलीस दलातील आणखी दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा प्रकरणी पोलीस आयुक्तांनी ही कारवाई केली.

पोलीस मुख्यालयात दोन्ही पोलीस ड्युटीवर होते. पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे आणि सहाय्यक फौजदार जनार्दन काळे अशी बडतर्फ झालेल्या पोलिसांची नावे आहेत.

पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना तिथूनच ड्रग्ज रॅकेट चालवणाऱ्या ललित पाटीलने पलायन केल्यानंतर खळबळ उडाली होती. ललित पाटीलला अटक केल्यानंतर आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले. दरम्यान, त्याच्या पलायन प्रकरणी याआधी दोन पोलिसांना बडतर्फ केले होते. नाथा काळे आणि अमित जाधव अशी त्यांची नावे आहेत. आतापर्यंत या प्रकरणी एकूण १० पोलिसांना बडतर्फीच्या कारवाईला सामोरं जावं लागलं आहे.

दरम्यान, ससून रुग्णालयाचे तत्कालीन डीन संजीव ठाकूर यांचा मुलगा डॉ. अमेय ठाकूर यांनी राजीनामा दिला आहे. ललित पाटील प्रकरणामुळे डॉ. संजीव ठाकूर यांना पदमुक्त केल्यानंतर अमेय ठाकूर यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला. अमेय ठाकूर हे ससून रुग्णालयात सर्जरी विभागाचे प्राध्यापक म्हणून काम पाहत होते. विशेष म्हणजे संजीव ठाकूर यांनी लागलीच हा राजीनामा मंजूर केल्याचे देखील समोर आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.