Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बंगळूरमधील पोलिस अधिकाऱ्याचा इंजिनिअर मुलगा ताब्यात यूपीमधून एकजण रडारवर : संसद घुसखोरी प्रकरण

बंगळूरमधील पोलिस अधिकाऱ्याचा इंजिनिअर मुलगा ताब्यात
यूपीमधून एकजण रडारवर : संसद घुसखोरी प्रकरण



नवी दिल्ली : खरा पंचनामा

संसद सुरक्षा भंग प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला आणखी दोन संशयितांची माहिती मिळाली आहे. अटक आरोपींची दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाने समोरासमोर चौकशी केली.

याआधी देशाच्या विविध भागात आणखी दोन जणांना त्यांच्या जबाब आणि शरीरावरील खुणांच्या आधारे चौकशी करण्यात आली होती. यापैकी बंगळूरमधील एका अभियंत्याला ताब्यात घेण्यात आले आहे, तर उत्तर प्रदेशातील जालौन येथील एका व्यक्तीचीही सखोल चौकशी करण्यात आली आहे. एबीपीए न्यूजच्या सूत्रांनी सांगितले की, संसद भवन प्रकरणात पोलीस तपासात आणखी दोन संशयितांची नावे समोर येत आहेत.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाने कर्नाटकातील बागलकोट शहरातून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला ताब्यात घेतले आहे. त्याचे नाव साई कृष्ण आहे. त्याचे वडील उच्च पोलिस अधिकारी आहेत. साई हा मनोरंजनचा मित्र असल्याचं म्हटलं जात आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी त्याची चौकशी केली, त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन दिल्लीत आणण्यात आले. याशिवाय उत्तर प्रदेशातील जालौन येथील अतुल कुलश्रेष्ठनावाच्या व्यक्तीचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. अतुल कुलश्रेष्ठ 50 वर्षाचा असून तो सुद्धा बेरोजगार आहे. दोघांचे जबाब नोंदवण्यात आले असून, संसदेच्या प्रकरणातील त्यांच्या सहभागाचा तपास सुरू आहे. सुरक्षा भंगात त्यांची काही भूमिका होती का, याचा तपास करण्यात येत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.