Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गोपीचंद पडळकर यांच्या दिशेने चप्पल फेकली

गोपीचंद पडळकर यांच्या दिशेने चप्पल फेकली



पुणे : खरा पंचनामा

पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे ओबीसी एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक ओबीसी नेते या सभेला हजर होते.

ही सभा आटोपल्यानंतर एक धक्कादायक प्रकार घडला. सभा संपल्यानंतर गोपीचंद पडळकर या सभास्थळाला लागून असलेल्या अण्णा काटे यांच्या उपोषणस्थळाला भेट देण्यासाठी गेले. यावेळी तिथे असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांनी गोपीचंद पडळकर यांच्या दिशेने चप्पल फेकली. मराठा आंदोलकांनी यावेळी गो बॅक अशा घोषणा देखील दिल्या.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचं आरक्षणासाठी ठिकठिकाणी उपोषण आणि आंदोलन सुरु आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजाकडूनही सभा घेतल्या जात आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये सध्या वाकयुद्ध रंगलं आहे. गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर गोपीचंद पडळकर आंदोलनस्थळी गेले तेव्हा त्यांच्या दिशेने चप्पल फेकण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. गोपीचंद पडळकर आता तिथून निघून गेले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.