वाढत्या गुन्हेगारीवरून पोलिस अधिकाऱ्यांची कानउघडणी
घरफोडी, चोऱ्या रोखा, गस्त वाढवा
: पोलिस अधीक्षकांच्या सूचना
सांगली : खरा पंचनामा
घरफोडी, चोऱ्या, चेनस्नॅचिंग रोखण्यासाठी बाजारातील गस्त, पायी गस्तिसह बिट मार्शलने अधिक सतर्क राहिले पाहिजे. वाढत्या चोऱ्या रोखण्यावर अधिक भर दिला पाहिजे, अशा सूचना करत पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी वाढत्या गुन्हेगारीवरून पोलिस अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
आज बुधवारी सांगलीत गुन्हेगारी आढावा बैठक झाली. वर्षभरातील गुन्हेगारीचा आढावा त्यांनी घेतला. तसेच तपासाबाबत विशेष सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते. डॉ. तेली म्हणाले,‘‘गतवर्षी जिल्ह्यात घरफोडीच्या पाचशे घटना घडल्या होत्या. त्या तुलनेत यंदाच्या वर्षी संख्या ४१० आहे. तुलनात्मक आकडेवारी पाहिली तर संख्या कमी आहे. परंतू हे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी प्रभावी गस्त होणे अपेक्षित आहे.
आठवडा बाजारातील गस्त वाढवली पाहिजेत. पायी गस्तीवर अधिक भर दिला पाहिजे. तसेच सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवले पाहिजे. त्यांच्यावर वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई केली पाहिजे. याशिवाय ऑनलाइन फसवणूकीची प्रकार वाढले आहे. त्यातील संशयितांचा शोध घेवून कारवाई केली पाहिजे.’’
प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर चाप लावण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. याशिवाय पोलिस काका, पोलिस दिदि हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
एकुणच वाढत्या गुन्हेगारीवरून पोलिस अधीक्षकांनी चांगलीच कानउघडणी केली. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रलंबित गुन्हे, तक्रार अर्ज यांचा आढावा यावेळी त्यांनी घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.