Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एटीएममध्ये बनावट नोटांचा भरणा, तिघांवर गुन्हा

एटीएममध्ये बनावट नोटांचा भरणा, तिघांवर गुन्हा



सांगली : खरा पंचनामा

शहरातील राजवाडा चौकातील एटीएम केंद्रात स्वत:च्या खात्यावर पाचशे रुपयांच्या १९ बनावट नोटांचा भरणा केल्याप्रकरणी खातेदारासह अन्य दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत आयसीआयसी बॅँकेचे अधिकारी बाळासाहेब खराडे (रा. तुळजाईनगर, सांगली) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित सतीश सुखदेव पाटील यांचे बॅँकेत खाते आहे. १४ रोजी दुपारच्या सुमारास अन्य दोघा व्यक्तींच्या मदतीने संगनमत करुन ५०० रुपयांच्या नोटा बनावट असल्याचे माहित असूनही एटीएम मशीनमध्ये भरल्या. ही बाब लक्षात येताच त्याची खातरजमा करुन बॅँकेतील अधिकाऱ्यांनी संशयितांविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.