Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'नोकरी घालवून रस्त्यावर आणू.' अनेक पोलीस अधिकाऱ्यांना कर्ज वसुली एजंटच्या धमक्या

'नोकरी घालवून रस्त्यावर आणू.'
अनेक पोलीस अधिकाऱ्यांना कर्ज वसुली एजंटच्या धमक्या



वसई : खरा पंचनामा

'कर्जाचे हप्ते नाही दिले तर गंभीर परिणाम होतील', 'नोकरी घालवून रस्त्याव आणू..' या धमक्या कुणा सर्वसामान्य माणसांना नाहीत तर चक्क वसईतील अनेक पोलीस अधिकाऱ्यांना आल्या आहेत. अॅक्सीस बँकेच्या कर्जवसुली करणाऱ्या एजंटकडून या धमक्या सातत्याने येत आहेत. 'नोकरी घालवून रस्त्यावर आणू.' याप्रकरणी वसई पोलिसांनी अॅक्सीस बँकेच्या कर्ज वसुली करणाऱ्या एजंटांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे पोलीस आहे हे माहित असूनही या धमक्या गेल्या काही दिवसांपासून देण्यात येत होत्या.

कर्ज वसुली करणाऱ्या (रिकव्हरी एजंट) ची दादागिरी सर्वसामान्यांना नवीन नाही. कर्जाचे हप्ते थकले की बँकांचे खासगी एजंट फोन करून धमक्या देत असतात. या धमक्यांमुळे अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहे. या एजंटांचा त्रास किती भयानक असतो, त्याचा प्रत्यय वसई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना आला आहे. वसई पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने अॅक्सीस बँकेकडून साडेसहा लाखांचे खासगी कर्ज घेतले होते. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे त्याला तीन हप्ते भरता आले नव्हते. त्याची रक्कम ४५ हजार एवढी थकली होती. कर्जाचे हप्ते भरण्यासाठी या पोलीसाला तसेच त्याच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना धमक्यांचे फोन जाऊ लागले. मात्र त्याही पुढे जाऊन हा पोलीस ज्या पोलीस ठाण्यात काम करतो तेथील अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या क्रमांकांवरून धमक्यांचे फोन येऊ लागले.

तुमच्या सहकाऱ्याने आमचे ३ हप्ते थकवले आहे. ते पैसे तुम्ही भरा किंवा त्याला हजर करा, असे सांगण्यात आले. वास्तविक त्या पोलिसाचे कर्ज वैयक्तिक होते. इतरांचा काही संबंध नव्हता. परंतु कर्ज वसुली करणारे एजंट सर्व पोलीस अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या क्रमांकाने फोन करून धमकावत होते. विशेष म्हणजे पोलीस आहे, हे माहित असूनही ते धमक्या देत होते. 'तुम्ही पोलीस असला तरी नोकरी घालवू, रस्त्यावर आणून बरबाद करू', अशा प्रकारे तसेच शिवराळ भाषेत फोन करत होते. फोन करणाऱ्यांमध्ये महिलांचा समावेश होता. यामुळे पोलिसांना अॅक्सीस बँकेच्या ८ मोबाईल क्रमांकांवरून फोन करणाऱ्या महिलांविरोधात वसई पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. १ नोव्हेंबर पासून पोलिसांना या धमक्यांचे फोन येत होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी ही तक्रार दाखल केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.