Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अशोक मासाळे यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव मोफत नेत्रतपासणी शिबिरासह विविध उपक्रमांचे आयोजन

अशोक मासाळे यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव
मोफत नेत्रतपासणी शिबिरासह विविध उपक्रमांचे आयोजन



सांगली : खरा पंचनामा

अण्णा लोकसेवा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, टिंबर मर्चेंट पतसंस्थेचे संचालक, उद्योजक अशोक मासाळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिनी मासाळे यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांची शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्रतपासणी शिबिरासह अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. 


मासाळे यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिका शाळा क्र. ३८ येथे विद्यार्थ्याना गणवेश वाटप करण्यात आले. माजी मंत्री, आमदार डॉ. विश्वजित कदम, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, कॉंग्रेसचे शहर-जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय बजाज, सी न्यूजचे संचालक धनेश शेटे, जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष तसेच दूरध्वनीवरून मासाळे यांना शुभेच्छा दिल्या. त्याशिवाय शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रातील विविध मान्यवरांनीही मासाळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. 

मासाळे यांच्या वाढदिनी प्रभाग क्र. दहामधील नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. याचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. त्याशिवाय प्रभाग क्र. दहामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आले. 

सचिन आरवळे, बाजीराव गस्ते, शुभम बनसोडे, राकेश ऐवळे, उत्तम कांबळे, अक्षय मासाळे, अविनाश कांबळे, सचिन काटकर, राजू गस्ते, विक्रम चव्हाण, आशिष चौधरी यांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.