Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हिसडा मारून वृद्धेचे दागिने लंपास करणाऱ्यास अटक सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त, विटा पोलिसांची कारवाई

हिसडा मारून वृद्धेचे दागिने लंपास करणाऱ्यास अटक
सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त, विटा पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

खानापूर तालुक्यातील घोटी बु. येथे हिसडा मारून महिलेचे दागिने लंपास करणाऱ्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीचे सव्वादोन लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली. 

पृथ्वीराज ऊर्फ रामा कुमार मदने (वय २४, रा. वासुंबे, ता. खानापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. १८ आक्टोबर रोजी घोटी बु. येथील ग्रामपंचायतीसमोर लक्ष्मी कदम या वृद्धेचे गळ्यातील दागिने चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केले होते. याबाबत विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित चोरट्यांना पकडण्याच्या सूचना निरीक्षक डोके यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. 

पथक चोरट्यांचा शोध घेत होते. त्यावेळी ही चोरी रामा मदने तसेच त्याचा साथीदार तुषार पवार यांनी केल्याची माहिती खबऱ्याद्वारे पथकाला मिळाली. तसेच यातील रामा मदने हा विट्यातील ग्रामीण रूग्णालयाच्या परिसरात फिरत असल्याचीही माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने तुषार पवार याच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच अन्य दोन गुन्ह्यांचीही कबुली दिली. त्याला अटक करून त्याच्याकडून चोरीचे दागिने, एक दुचाकी असा सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लवकरच तुषार पवार याला अटक करणार असल्याचे निरीक्षक डोके यांनी सांगितले. 

विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर गायकवाड, उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, प्रमोद साखरपे, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे, कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.