Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एलसीबी, 'डीबी'मधील निष्क्रीय लोकांना तातडीने हटवा कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या सूचना

एलसीबी, 'डीबी'मधील निष्क्रीय लोकांना तातडीने हटवा
कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या सूचना



सोलापूर : खरा पंचनामा

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण येथील गुन्ह्यांचे प्रकटीकरण तातडीने व्हायला हवे. पाचही जिल्ह्यातील पोलिसांनी एकमेकांशी समन्वय साधून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करावेत. गुन्हे प्रकटीकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या एलसीबी आणि सर्वच पोलिस ठाण्यांतील निष्क्रीय अधिकारी, कर्मचाऱ्याना तातडीने हटवा अशा सूचना कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी दिल्या. 

सोलापूर येथे नुकत्याच कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यावेळी महानिरीक्षक फुलारी यांनी पाचही जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक तसेच अन्य अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी राज्यात सुरू असणारी विविध प्रकारची आंदोलने, आगामी निवडणुका, सण, उत्सव, गुन्ह्यांचे प्रमाण, गुन्ह्यांची निर्गती आदी विविध विषयांवर मार्गदर्शन करून सूचना दिल्या.  

पाचही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवून काम करावे. शिवाय गुन्हे घडूच नयेत यासाठी विशेष काळजी घ्यावी अशाही सूचना दिल्या. घडलेल्या गुन्ह्यांची तातडीने निर्गती करावी. गुन्हे उघडकीस आणण्यात निष्क्रीय असणाऱ्या एलसीबी आणि सर्व पोलिस ठाण्यांच्या डीबी पथकातील निष्क्रीय लोकांना तातडीने हटवा. त्यांच्याजागी कार्यक्षम लोकांना संधी द्या अशा सूचना महानिरीक्षक फुलारी यांनी दिली. 

पाचही जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या माहितीचे आदान-प्रदान करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत. तसेच प्रलंबित गुन्हे उघडकीस आणावेत. प्रलंबित तक्रारी अर्ज तातडीने निकाली काढा. आगामा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सजग रहा. विविध समाजांच्या आरक्षण मागणीसाठीची आंदोलने व्यवस्थित हाताळून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कार्यरत रहा अशाही सूचना महानिरीक्षक फुलारी यांनी यावेळी दिल्या. 

यावेळी कोल्हापूरचे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल, सांगलीचे पोलिस अधिक्षक डॉ. बसवराज तेली, साताराचे पोलिस अधिक्षक समीर शेख, सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलिस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.