कोल्हापूरच्या राजकारणात नवीन गट्टी
खासदार मुन्ना झाले हसन मुश्रीफांचे सारथी
कोल्हापूर : खरा पंचनामा
राज्यात सलग दोन वर्ष झालेल्या राजकीय भूकंपानंतर कोल्हापूर जिल्ह्यातही त्याचे धक्के जाणवले. त्यामुळे राजकारणाची पार खिचडी होऊन गेली आहे. जिल्ह्याच्या मुश्रीफ आणि बंटी पाटील या जोडगोळीच्या वाटा आता स्वतंत्र झाल्याने नवीन गट्टी आता जमू लागली आहे. भाजप खासदार धनंजय महाडिक आता वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे सारथी बनले.
जिल्हा पोलिस दलाला हस्तांतरित केलेल्या वाहनांचा सोहळा आज धनंजय महाडिक आणि हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी धनंजय महाडिक यांच्या बुलेट गाडीवर हसन मुश्रीफ बसले होते. त्यामुळे या नव्या जोडगोळीची जोरदार चर्चा सुरू झाली. काल हसन मुश्रीफ यांनी महायुतीच्या पक्षांची समन्वय बैठक घेतली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी हे चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणामध्ये नवी समीकरणे तयार होत आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.