Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे विशेष पुरस्काराने सन्मानित

राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे विशेष पुरस्काराने सन्मानित



कोल्हापूर : खरा पंचनामा

शहरातील राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह त्यांच्या गुन्हे शोध पथकाने गेल्या महिन्यात कोम्बिंग आपरेशनवेळी मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रे जप्त केल्याबद्दल पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याहस्ते निरीक्षक तनपुरे यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला.   

निरीक्षक तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने नोव्हेंबर महिन्यात राजेंद्रनगर जवाहरनगर, सुभाषनगर आदी भागात कोम्बिंग आपरेशन करून एडका, तलवारी, चाकू, कोयता अशी १९ धारधार शस्त्रे जप्त केली होती. त्यांच्या या कारवाईमुळे मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी निरीक्षक तनपुरे यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला. त्यामुळे राजारामपुरी पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.