Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवार अधून-मधून स्पष्टीकरण देत असतात!

अजित पवार अधून-मधून स्पष्टीकरण देत असतात!



पुणे : खरा पंचनामा

अजित पवार यांनी मंथन शिबिरात अनेक गौप्यस्फोट केले. आता शरद पवार गट काय उत्तर देणार हे पाहावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार गटाची आज पुण्यात बैठक आहे. त्यानंतर ४ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यापूर्वी आमदार जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अजित पवार यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. भाजपसोबत जाण्याची सर्व नेत्यांना माहिती होत. सुप्रिया सुळे यांनी ७ दिवसाचा वेळ मागितला होता, असे अजित पवार म्हणाले होते. यावर जतंय पाटील म्हणाले, केलेल्या कृत्यानंतर स्पष्टीकरण देण्याची प्रत्येकाची पद्धत असते. अजित पवारांनी जी कती केली. त्याची वेगवेगळी स्पष्टीकरण ते अधून मधून देत असतात, असे जयंत पाटील म्हणाले.

अजित पवार यांनी केलेल्या आरोपावर मी योग्य वेळी सर्व सांगेन. अजित पवार यांनी माझ्या समोर प्रकाश सोळंखेंना पक्षाचं कार्याध्यक्ष करण्याचं सांगितलं. मात्र २०१९ मध्ये सोळंखेंवर जो अन्याय झाला. तो दूर करण्याची अजित पवारांना संधी असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

अजित पवार यांनी ४ लोकसभा जागेंवर लढण्याचे संकेत दिले आहेत. यात बारामती ही महत्वाची जागा आहे. पवार विरुद्ध पवार असा सामना रंगेल. अजित पवार यांचा वेगळा पक्ष आहे. त्यांना लढावे लागलेलच पण ते खरच ४ जागा लढवणार आहेत की लढवल्यासारखं दाखवणार आहे, हे पाहावं लागेल.

अजित पवार मुख्यमंत्री होतील असं संजय राऊत म्हणाले. यावर जयंत पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे यांना झोप लागू द्या. त्यांना कशाला त्रास देत आहात. ते बिचारे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री कोण? अशी चर्चा केली तर प्रशासन देखील त्यांचे ऐकत नाही. आता हे कधी जाणार, अशी परिस्थिती आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.