Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत धूम स्टाईलने महिलेचे सोन्याचे गंठण लंपास

सांगलीत धूम स्टाईलने महिलेचे सोन्याचे गंठण लंपास



सांगली : खरा पंचनामा

विश्रामबाग परिसरातील पार्श्‍वनाथ कॉलनीत भरदिवसा महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्यांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी धूम स्टाईलने लंपास केले. आज मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. 

याप्रकरणी संजीवनी दिलीप हुक्कीरे (वय ५३ रा. सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संजीवनी हुक्कीरे या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील धामणी रोडवरील पार्श्वनाथ कॉलनीत राहतात. आज सकाळी त्या कामानिमित्त दुचाकीवरून बाहेर गेल्या होत्या. सकाळी साडे अकराच्या सुमारास त्या घरी परत आल्या. घरासमोर त्यांची गाडी लावत असताना दुचाकीवरून दोन अज्ञात व्यक्ती आले. हुक्कीरे यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ आले असता त्यांनी संजीवनी हुक्कीरे यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण हिसडा मारून पलायन केले. 

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.