सुनील केदार यांना आणखी एक दणका; आमदारकी रद्द
नागपूर : खरा पंचनामा
एनडीसीसी बँक घोटाळा प्रकरणी पाच वर्षांच्या तुरुगवासाची शिक्षा झालेले काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. न्यायालयाने बँक घोटाळा प्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर भाजपकडून सुनील केदार यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, आता विधानसभेचं त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आल्याची अधिसूचना विधानभवन सचिवालयाकडून जारी करण्यात आलीय.
एनडीसीसी बँक घोटाळा प्रकरणी शुक्रवारी न्यायालयाने सुनील केदार यांच्यासह ५ जणांना तुरुगवासाची शिक्षा सुनावली. तसंच १२.५ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. शिक्षा सुनावल्यानंतर सुनील केदार यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुनील केदार यांना मायग्रेनचा आणि घशाच्या संसर्गाचा त्रास असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सुनील केदार यांचा रुग्णालयातला मुक्काम वाढण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.