आम्ही विचारांशी बांधील आहोत, आम्ही संधी साधू नाही!
पुणे : खरा पंचनामा
कर्जतच्या अजित पवार गटाच्या शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी शरद पवारांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केल्याचे यला मिळाले. अजित पवार गटाने केलेल्या आरोपांना ताकदीनिशी उत्तर देण्यासाठी आणि आगामी निवडणुकांची रणनिती ठरवण्यासाठी आता शरद पवार मैदानात उतरले आहेत.
त्यांनी पिंपरी-चिंचवड येथील अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन निवडणुका झाल्यानंतर एक नवी फळी दिसेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
शरद पवार म्हणाले की, जे सोडून गेलेत, त्यांची चिंता करण्याचं कारण नाही. कारण जे सोडून गेले आहेत त्यांच्यामुळे नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. आता नवीन लोकांना संधी देण्याची गरज निर्माण झाली आहे. आता जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. तुमच्या माध्यमातन राज्याला नेतृत्वाची एक नवी फळी मिळणार आहे. निवडणुका झाल्यानंतर एक नवी फळी दिसले, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
ज्या लोकांना आपण मोठे केले ते आपल्याला सोडून गेले. त्या लोकांनी नवीन प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र वेगळं वातावरण निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर आम्ही विचारांशी बांधील आहोत, आम्ही संधी साधू नाही, असा टोला शरद पवार यांनी पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयोजित बैठकीत अजित पावर गटाला लगावला. यावेळी त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आवाहनही कार्यकर्त्यांना केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.