Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'एका सामान्य शिक्षकाचा मुलगा शेकडो कोटी मालमत्तेचा मालक कसा?'

'एका सामान्य शिक्षकाचा मुलगा शेकडो कोटी मालमत्तेचा मालक कसा?'



मुंबई : खरा पंचनामा

एका सामान्य शिक्षकाचा मुलगा शेकडो कोटी मालमत्तेचा मालक कसा असा सवाल उपस्थित करत पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केलेत. तसेच ज्याप्रकारे माझी चौकशी करण्यात आली त्याचप्रकारे गिरीश महाजनांची देखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील गिरीश महाजन यांनी केलीये. मंत्री या नात्याने तुम्ही तुमच्या पदाचा दुरुपयोग केल्याचं एकनाथ खडसे यांनी यावेळी म्हटलं.

सध्या एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद हा चांगलाच पेटत चाललाय. त्यातच सलीम कुट्टा प्रकरणावरुन एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात पुन्हा एकदा वाद रंगला. यावेळी एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर गंभीर आरोप केलेत. एका सामान्य शिक्षकाचा मुलगा शेकडो कोटी मालमत्तेचा मालक कसा असा प्रश्न एकनाथ खडसेंनी उपस्थित केलाय.

राज्यात विविध प्रश्न असताना नाथाभाऊ एवढा तुमच्यासमोर असेल तर मग सरकारचा सारा उपयोग नाथाभाऊला बदनाम करण्यासाठी करता का ? असा सावल देखील एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना केलाय. सुधाकर बडगुजर यांची एसआयटी चौकशी केली जात आहे, तशीच च महाजन यांची सुद्धा चौकशी होऊ द्या. दहशतवादी कृत्य गिरीश महाजन यांनी केले आहे यापूर्वी गिरीश महाजन हे मोक्याचे आरोपी आहेत. दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाबरोबर तुम्ही जेवण केलं होतं ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, असं खळबळजनक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलंय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.