Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पक्षातली फूट हा नियोजित राजकीय कट, एका रात्रीत हे शक्य नाही ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद संपला

पक्षातली फूट हा नियोजित राजकीय कट, एका रात्रीत हे शक्य नाही
ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद संपला



नागपूर : खरा पंचनामा

शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणी शेवटच्या टप्प्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरील ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तीवाद संपला. आज ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी पक्षातली फूट हा नियोजनबद्ध राजकीय कट असल्याचा युक्तिवाद आज कोर्टात केला आहे. 20 आणि 21 जून 2022 ला जे घडलं ते एका रात्रीत होत नाही, यासाठी प्लॅनिंग केलं गेलं होतं

आमदार अपात्रता प्रकरणात ठाकरे गटाच्या वकिलांचा अध्यक्षांसमोर युक्तिवाद पूर्ण झाला आहे. कामत म्हणाले, 20 आणि 21 जून 2022 ला जे घडलं ते एका रात्रीत होत नाही. यासाठी प्लॅनिंग केलं गेलं होतं. ते उत्तर देताना म्हणत आहे की, शिवाजी महाराज गेले म्हणून आम्ही सुरतला गेलो. तुम्ही तुमच्या राजकीय महत्त्वकांक्षेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाव घेत आहे आणि अवमान करताय. हे सगळे आमदार एकाच वेळी निघतात आणि एकाच ठिकाणी एकाच हॉटेलमध्ये जातात आणि विरोधीपक्षाला पाठींबा द्यायला तयार होतात ? हा सगळा राजकीय नियोजन बद्ध कट होता हे या सगळ्या घटनांकडे पहिल्यावर दिसतंय.

कामत म्हणाले, राजकीय पक्ष विधीमंडळ पक्षाला ब्लॅक चेकप्रमाणे अमर्याद अधिकार देऊ शकत नाही. विधीमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाच्या मार्गदर्शनानेच काम करत असतो. राजकीय पक्षाच्या विचारधारेनुसार विधीमंडळ पक्ष काम करत नसेल तर त्यावर अंकुश ठेवण्याचा अधिकार राजकीय पक्षाला आहे. 2018 पर्यंत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून विरोध केला नाही किंवा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात अध्यक्ष पदासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीत निवडणूक लढवली नाही. तुम्हाला पक्षाच्या अध्यक्षांचे विचार पटत नसतील, तर लोकशाहीने निवडणूक घेऊन त्यांना हटवण्याचे अधिकार दिलेले आहेत.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे असा दावा प्रतिज्ञापत्रमध्ये दावा करण्यात आला आहे. 20 जून 2022 पर्यंत शिवसेना पक्ष एकच असताना त्याची घटना रचना असताना 21 आणि 22 जून ला आमदार उपस्थित राहिले नाही. ते सुरतला, गुवाहाटीला गेले. 29 जूनला राज्यपालांकडे गेले. त्यांची बैठकीला अनुपस्थिती हीच पक्षविरोधी कृती आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये दावा करण्यात आलाय की एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना कशी होऊ शकते? असा सवाल कामत यांनी केला. शिंदे गटातील आमदार उत्तर देतात की आम्ही एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिला आम्ही त्यांच्यासोबत आहोत याचा अर्थ जर एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले तर हे सुद्धा अपात्र ठरणार, असेही कामत म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.