Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिस अधिकाऱ्यालाच ५ हजारांची लाच देणाऱ्या तरुणाला अटक लाच घेण्याचा आग्रह करून एसीबीकडे केली होती तक्रार; कडेगाव येथील घटना

पोलिस अधिकाऱ्यालाच ५ हजारांची लाच देणाऱ्या तरुणाला अटक
लाच घेण्याचा आग्रह करून एसीबीकडे केली होती तक्रार; कडेगाव येथील घटना



सांगली : खरा पंचनामा

भावाविरोधात केलेल्या अर्जानुसार गुन्हा दाखल करून त्यासाठी ५ हजारांची लाच घेण्याचा पोलिस अधिकाऱ्यालाच आग्रह करणाऱ्या तरुणाला लाच देताना रंगेहात पकडण्यात आले. कडेगाव येथे मंगळवारी दुपारी लचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. विशेष म्हणजे या अधिकाऱ्यालाच लाच घेण्याचा आग्रह करून त्याच्या विरोधातच त्या तरुणाने लचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. 

अभिजित नारायण गोरड (वय ३६, रा. उपाळे मायनी, ता. कडेगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गोरड याने कडेगाव पोलिस ठाण्यात भावाविरोधात तक्रार अर्ज केला होता. त्या अर्जानुसार गुन्हा दाखल करून त्यासाठी ५ हजारांची लाच घेण्याचा पोलिस अधिकाऱ्यालाच आग्रह त्याने धरला होता. त्या पोलिस अधिकाऱ्याला लाच घेण्याचा आग्रह करून त्याच पोलिस अधिकाऱ्याच्या विरोधात त्याने सांगलीतील लचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. मात्र गोरड लाच देण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार संबंधित पोलिस अधिकाऱ्याने लचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

मात्र तक्रारदार पोलिस अधिकाऱ्याला लाच घेणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत गोरड याच्याविरोधात सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. विभागाने याची पडताळणी केल्यानंतर गोरड याने ५ हजारांची लाच घेण्याचा आग्रह केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी दुपारी गोरड याला लाच देताना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरोधात कडेगाव पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शासकीय, निमशासकीय लोकसेवकांनी लाच मागितल्यास 9821880737 या मोबाईल क्रमांकावर थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन उपअधीक्षक पाटील यांनी केले आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, प्रितम चौगुले, धनंजय खाडे, अजित पाटील, सलीम मकानदार, रामहरी वाघमोडे, ऋषिकेश बडणीकर, उमेश जाधव, सुदर्शन पाटील, सिमा माने, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव, विना जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.