Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विश्वास नांगरे पाटील पुण्याचे नवे आयुक्त? शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या स्टेटसमुळे चर्चा

विश्वास नांगरे पाटील पुण्याचे नवे आयुक्त? 
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या स्टेटसमुळे चर्चा



पुणे : खरा पंचनामा

महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ आईपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील वारंवार चर्चेत असतात. विश्वास नांगरे पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विश्वास नांगरे पाटील पुण्याचे नवे आयुक्त होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा आता सुरू आहेत. गृहमंत्रालयाच्या आदेशापुर्वीच विश्वास नांगरे पाटील पुण्याचे नवे आयुक्त असल्याचे स्टेटस दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांने याबाबतचा स्टेटस ठेवला आहे. त्यामुळे आता विश्वास नांगरे पाटील पुण्याचे नवे आयुक्त होणार आहेत का अशा चर्चा आता सुरू झाली आहे.

गृहमंत्रालयाच्या आदेशापुर्वीच विश्वास नांगरे पाटील पुण्याचे नवे आयुक्त असल्याचे स्टेटस दिसून येत आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांने याबाबतचा स्टेटस ठेवला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये बदल्यांचे राजकारण मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. अशातच आता नवे पुणे पोलीस आयुक्त कोण होणार याबाबतची उत्सुकता आहे. अशातच शिवसेनेच्या (शिंदे गट) एका पदाधिकाऱ्याने थेट विश्वास नांगरे पाटलांचा फोटो ठेवत हेच पुण्याचे पोलीस आयुक्त होणार आहेत का? असा स्टेटस ठेवल्याने शहरात चर्चा सुरू झाली आहे. 

"बॉस लवकरच पुण्यात?" असा मजकूर लिहीत नांगरे पाटील यांचा फोटो लावून केलेल्या स्टेटसची पुण्यासह राज्यभरातील आयपीएस आणि वरीष्ठ अधिकारी यांच्यात चर्चा सुरू आहे. विश्वास नांगरे पाटील सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.