Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अर्जुन खोतकर यांच्या खंद्या समर्थकावर गोळीबार

अर्जुन खोतकर यांच्या खंद्या समर्थकावर गोळीबार



जालना : खरा पंचनामा

अर्जुन खोतकर यांच्या कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. शहरातील मंठा चौफुली भागातील होंडा शोरूमसमोर गोळीबाराची घटना घडली. गजानन तौर हे रामनगर कारखान्याकडून जालनाकडे त्यांच्या चारचाकी वाहनाने येत होते.

पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी तौर यांच्या दिशेने गावठी पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्याची माहिती आहे.

चार गोळ्यापैकी दोन गोळ्या तौर यांना लागल्या आहेत, तर दोन त्यांच्या अंगाला चाटून गेल्या असल्याची माहिती आहे. तौर यांना उपचारसाठी सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. सदर घटनेमुळे जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे. गजानन तौर हे अर्जुन खोतकर यांचा खंदा समर्थक असल्याचे बोलले जाते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.