Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत दि. २४ रोजी सांगली मेरेथोनचे आयोजन राधेय फौंडेशनचा उपक्रम

सांगलीत दि. २४ रोजी सांगली मेरेथोनचे आयोजन
राधेय फौंडेशनचा उपक्रम



सांगली : खरा पंचनामा

शहरातील राधेय फौंडेशनतर्फे दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी सांगली मेरेथोन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला आणि पुरूषांचा खुला गट, ग्रेट सांगली रन आणि १६ वर्षाखालील मुले, मुली या गटात या स्पर्धा होणार आहेत. विश्रामबाग येथील नेमीनाथनगरमधील कल्पतरू क्रीडांगणावर या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी सांगलीतील विविध संस्था मदत करत आहेत. या स्पर्धेत राज्यभरातून तीन हजार स्पर्धक सहभागी होणार असल्याची माहिती फौंडेशनचे डॉ. गणेश चौगुले यांनी दिली. 

या स्पर्धेत १६ वर्षाखालील मुले आणि मुली यांची तीन किलोमीटर मेरेथोन होणार आहे. ग्रेट सांगली रनमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी पाच किलोमीटर अंतर पार करावे लागणार आहे. खुला गट पुरूषांसाठी ३१ किलोमीटर तर महिलांसाठी २१ किलोमीटर अंतर पार करावे लागणार आहे. शिवाय खुला गट महिला आणि पुरूष गटासाठी दहा किलोमीटर अंतराची मेरेथोन होणार आहे. पहाटे सव्वापाच वाजल्यापासून सकाळी दहापर्यंत विविध गटातील या स्पर्धा पार पडणार आहेत. या स्पर्धेसाठी सुमारे दीड लाखांची बक्षीसे विजेत्यांना देण्यात येणार आहेत. शिवाय सहभागी धावपटूंसाठी लकी ड्रॉही ठेवण्यात आला आहे. 

या स्पर्धेत नाममात्र प्रवेश शुल्क आकारण्यात येणार असून सहभागी धावपटूंना टी-शर्ट, बॅग, मेडल, प्रमाणपत्र, नाश्ता, टायमिंग बीप चिप देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सांगलीतील विविध संघटना, सामाजिक ट्रस्ट, असोसिएशन यांनी सहभाग नोंदवला आहे. विविध व्यापारी संस्था स्पर्धेसाठी मदत करीत आहेत. सांगलीची यलो सिटी ही ओळख सर्वाना व्हावी यासाठी जास्तीत जास्त स्पर्धकानी यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

डॉ. गणेश चौगुले, राजेंद्र लंबे, दीपक स्वामी, प्रफुल्ल जाधव, हर्षद सावळे, डॉ. वैभव बरगुले, सुभाष सूर्यवंशी आदी या स्पर्धेचे नियोजन करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.