Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अधिष्ठातांमुळेच सांगली सिव्हीलच्या सिटी स्कॅन मशीनचा निधी गेला परत कॉंग्रेसचे सरचिटणीस अशोक मासाळे यांचा आरोप, मंत्र्यांसह वरीष्ठांकडे तक्रार करणार

अधिष्ठातांमुळेच सांगली सिव्हीलच्या सिटी स्कॅन मशीनचा निधी गेला परत
कॉंग्रेसचे सरचिटणीस अशोक मासाळे यांचा आरोप, मंत्र्यांसह वरीष्ठांकडे तक्रार करणार



सांगली : खरा पंचनामा

पश्चिम महाराष्ट्रातील गोरगरीब रूग्णांचा आधार असणाऱ्या सांगलीच्या सिव्हील हॉस्पिटलसाठी सिटी स्कॅन मशीन खरेदीसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी वेळेत या मशीनची खरेदी न केल्याने हा निधी शासनाकडे परत गेला आहे. त्यामुळे रूग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांच्यावर निलंबनाची किंवा त्यांच्या बदलीची कारवाई करावी अशी मागणी कॉंग्रेसचे सरचिटणीस अशोक मासाळे यांनी केली आहे. याबाबत सिव्हील प्रशासनाला त्यांनी निवेदन दिले असून संबंधित खात्याचे मंत्री तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे मासाळे यांनी सांगितले. 

सांगलीच्या सिव्हील हॉस्पिटलसाठी दि. २७ मार्च २०२२ रोजी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने सिटी स्कॅन मशीन देण्यासाठी हाफकीन या कंपनीला निधी वर्ग केला होता. हा निधी वर्ग झाल्यानंतर अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांच्यासह सिव्हील प्रशासनाने हे मशीन खरेदीसाठी तसेच ते बसवण्यासाठी कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे दि. ३० मे २०२३ रोजी सिटी स्कॅन मशीनसाठी आलेला निधी शासनाकडे परत गेला आहे. याला अधिष्ठाता डॉ. नणंदकर हेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना निलंबित करावे किंवा त्यांची अन्यत्र बदली करावी अशी जोरदार मागणीही यावेळी मासाळे यांनी केली. 

अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांच्या भोंगळ कारभाराबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात येणार असल्याचे मासाळे यांनी सांगितले. तसेच सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यातील आमदारांनी हा प्रश्न उचलून धरावा असे आवाहनही मासाळे यांनी केले आहे. यावेळी मासाळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सिव्हील परिसरात जोरदार निदर्शने केली. यावेळी सांगली सिव्हीलचे सहायक अधिष्ठाता डॉ. देवकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

यावेळी राज्य प्रवक्ते संतोष पाटील, सर्जेराव पाटील, अनमोल पाटील, सुशांत कदम, बाजीराव गस्ते, सचिन आरवाळे, सचिन काटकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.