"गिफ्ट दिलेला पोपट दे, तरच घटस्फोट देईन"
पतीच्या मागणीसमोर पत्नीनं हात टेकले
पुणे : खरा पंचनामा
पती पत्नीच्या भांडणातून घटस्फोट झाल्याच्या अनेक घटना आपण अनेकदा ऐकल्यात. घटस्फोटावेळी पती-पत्नींमध्ये काही गोष्टींची देवाण-घेवाण होते. अनेकदा पतीला पत्नीला पोटगी द्यावी लागते. मात्र, पुण्यातील एका घटस्फोटानं सर्वांनाच अचंबित केलं आहे. अनेक घटस्फोटांमध्ये पत्नी मोठी पोटगी मागते किंवा मुलांच्या कस्टडीमुळे रखडतात. मात्र, हा घटस्फोट एका पोपटामुळे रखडला. बरं, आफ्रिकन पोपट परत दिला तरंच तुला घटस्फोट देईन, अशी अजब मागणी पतीनं पत्नीकडे केली आहे. घटस्फोटाच्या प्रकरणात पती आणि पत्नी या दोघांनीही पोटगी, स्त्रीधन, स्थावर, जंगम मालमत्तेवरील हक्क सोडले, पण त्यांचा जीव एका पोपटात अडकला.
पुण्यातील एका पतीनं घटस्फोट मिळवण्यासाठी थेट पत्नीला भेट म्हणून दिलेला पोपट परत देण्याची अट घातली आहे. घटस्फोटासाठी अर्ज केलेलं हे जोडपं सध्या आफ्रिकन पोपटामुळे चांगलंच चर्चेत आलं आहे. 2019 मध्ये पुण्यात या दोघांचा विवाह झाला होता. मात्र, गेल्या चार ते पाच वर्षांपासून या पती-पत्नीमध्ये मतभेद झाले. सततच्या भांडणांमुळे वैतागलेल्या पती पत्नीनं एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात दोघांनीही कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला. मात्र, दोघांचाही घटस्फोट एका आफ्रिकन पोपटवरुन रखडला. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयात या घटस्फोटाची सध्या वेगळी चर्चा सुरू होती. पण अखेर पत्नीनं तो आफ्रिकन पोपट परत दिला आणि घटस्फोटाचा मार्ग मोकळा झाला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.