Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जीएसटी विभागाचे स्पेअर पार्ट्स विक्रेत्यांवर देशभरात छापे मोठी करचुकवेगिरी उघड

जीएसटी विभागाचे स्पेअर पार्ट्स विक्रेत्यांवर देशभरात छापे
मोठी करचुकवेगिरी उघड



नवी दिल्ली : खरा पंचनामा

ऑटोमोबाईल क्षेत्रातील करचुकवेगिरी उघड होत असून, वस्तू आणि सेवा कर विभागाने मागील काही दिवसात गुजरातमधील चार प्रमुख शहरांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले.

कर विभागाने राज्यभरातील कार अक्सेसरीज आणि वाहनाच्या सुट्या भागांच्या 46 डीलर्सच्या सुमारे 72 ठिकाणी विस्तृत तपासणी तून रू 6 कोटींची करचोरी उघडकीस आणली आणि व्यापाऱ्यांकडून रू 1.50 कोटी वसूल केले.

जीएसटी अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या पथकांनी अहमदाबादमधील 35, सुरतमधील 12 आणि वडोदरामधील 12 ऑटो पार्ट्स आणि अक्सेसरीज डीलर्सवर छापे टाकले.

ऑटो पार्ट्स निर्मितीचे केंद्र असलेल्या राजकोटमधील 13 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. स्टॉक आणि अकाउंटिंग कागदपत्र तपासणी दरम्यान, अनेक ठिकाणी, व्यापाऱ्यांनी हिशेब न ठेवता मालाची वारंवार खरेदी-विक्री केली. मालाचे चुकीचे वर्गीकरण करून कमी दराने कर भरण्यात आल्याचेही विभागाच्या निदर्शनास आले आहे. कंपोझिशन स्कीम मध्ये आसतानाही व्यापारी ग्राहकांकडून स्वतंत्रपणे कर वसूल करत असल्याचे तपासात समोर आले आहे. शिवाय, 76 ठिकाणी ऑटो पार्ट्स विक्रेते नोंदणीशिवाय व्यवसाय करत असल्याचे उघड झाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.