Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोविड सेंटर घोटाळा : ईडीने सुजीत पाटकर यांच्यासह भागीदारांची १२ कोटींची मालमत्ता जप्त केली

कोविड सेंटर घोटाळा : ईडीने सुजीत पाटकर यांच्यासह भागीदारांची १२ कोटींची मालमत्ता जप्त केली



मुंबई : खरा पंचनामा

कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी सुजीत पाटकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ईडीने कोविड-19 जंबो सेंटर्स घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांचे जवळचे सुजीत पाटकर आणि त्यांच्या भागीदारांची सुमारे १२ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

म्युच्युअल फंड युनिटस, बँकेची खाती आणि ३ फ्लॅट्स अशी एकूण १२.२ कोटींची संपत्ती ईडी ताब्यात घेणार आहे. तीन फ्लॅट्सपैकी २.८ कोटींचा एक फ्लॅट हा सुजीत पाटकरांच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे.

पाटकर यांना या प्रकरणी ईडीने या वर्षी जुलैमध्ये अटक केली होती. त्यांनी लाइफलाइन मॅनेजमेंट सर्व्हिसेससाठी निविदा मिळवून ३१.८४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या घोटाळ्यातील सहआरोपींमध्ये राजीव साळुंखे आणि एका महिलेचा समावेश आहे. तसेच डॉ. हेमंत गुप्ता यांचा २ कोटी ७० लाखांचा म्युच्युअल फंड जप्त करण्यात आला आहे. सहआरोपींच्या खात्यात असलेले ३ कोटी आणि काही बँक खात्यांमध्ये ठेवलेले ३३ लाख रुपयेसुद्धा ईडीने जप्त केले आहेत. ही सर्व मालमत्ता कोविड घोटाळ्यात कमावल्याचा आरोप ईडीने केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.