Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेत सराफी दुकान फोडले; लाखोंचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

मिरजेत सराफी दुकान फोडले; लाखोंचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास



मिरज : खरा पंचनामा

मिरज शहरातील सराफ कट्टा रस्त्यावरील सोन्या चांदीचे दुकान फोडून चोरट्यांनी चार तोळे सोने आणि सात किलो चांदी असा साडे पाच लाखाचा ऐवज लंपास केला. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.

याप्रकरणी राहुल कदम यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिरज शहरात सराफ कट्टा येथे राहुल कदम यांचे आर के ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. शनिवारी रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर मध्यरात्री दुकानातील सीसीटीव्हीची वायर कापून शोकेसमधील चार तोळे सोन्याचे दागिने चांदीचे सात किलो दागिने लंपास केले.

रविवारी सकाळी राहुल कदम यांनी नेहमीप्रमाणे दुकान उघडल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला. तसेच चोरट्यांनी पत्रा कापण्यासाठी वापरलेले कटरही दुकानात सापडले. सोन्याचे आणखी दागिने लोखंडी तिजोरीत असल्याने ते चोरट्यांच्या हाती लागले नाहीत.

या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांच्या शोधासाठी श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. श्वानपथक दुकानापासून दोनशे मीटर अंतरावर जाऊन घुटमळले. दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर पोलिसांनी ताब्यात घेतला असून मध्यरात्री दोन वाजता सीसीटीव्हीची वायर कापल्याचे निदर्शनास आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.