निवृत्त पोलिस निरीक्षकावर प्राणघातक हल्ला
दगडाने मारहाण, प्रकृती चिंताजनक
पुणे : खरा पंचनामा
पुण्यातील वानवडी परिसरात निवृत्त पोलिस निरीक्षक वजीर शेख यांच्यावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांना दगडाने ठेचण्यात आले आहे. या प्राणघातक हल्ल्यामध्ये निवृत्त पोलिस निरीक्षक वजीर शेख हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
निवृत्त पोलिस निरीक्षक वजीर शेख यांच्यावर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोराचे नाव निष्पन्न झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वजीर शेख हे काही महिन्यांपुर्वी पोलिस दलातून निवृत्त झाले होते. ते सध्या कोंढवा परिसरात रहावयास आहेत. शुक्रवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास हल्लेखोराने त्यांना गाठले. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. दगडाने त्यांना ठेचण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर वानवडी येथील रूबी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.
हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या शेख यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते शुध्दीवर आलेले नाहीत. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास वानवडी पोलिस करीत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.