अजित पवारांचे खा. डॉ. अमोल कोल्हेंना खुले आव्हान
पुणे : खरा पंचनामा
शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना मोठे विधान केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना आव्हान देत यांच्यावर सडकून टीकाही केली. तसेच आम्ही ३ पक्ष मिळून पुढील निवडणूका लढणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, "शिरुर मतदारसंघातील विद्यमान खासदाराने पाच वर्ष त्याच्या मतदार संघात लक्ष दिले असते तर खूप बरे झाले असते. शरद पवार गटातील तो खासदार गेल्या दीड वर्षापूर्वी माझ्याकडे आला होता. मला राजीनामा द्यायचा आहे, असे त्याने सांगितले होते. त्या खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे-पाटील यांनी जीवाचं रान केलं होते. त्यामुळे आता त्या खासदाराने आम्हाला शिकवू नये."
आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून आणणारच, असा निर्धार व्यक्त करत अजित पवार यांनी यावेळी कोल्हे यांच्या अभिनयाचे कौतुक देखील केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.