सांगली मॅरेथॉन मध्ये सोमनाथ ऐवळे विजेता
सांगलीकरांचा प्रचंड प्रतिसाद; तीन हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी
सांगली : खरा पंचनामा
सांगलीत रविवारी झालेल्या सांगली मॅरेथॉन स्पर्धेत खुल्या गटात (21 किलोमीटर) सोमनाथ ऐवळे यांनी विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत विविध गटात तीन हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेला सांगलीकरांनी तसेच महाराष्ट्र राज्याबाहेरील स्पर्धकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
पालकमंत्री ना. सुरेश खाडे, डॉ. रवींद्र आरळी, माजी महापौर सुरेश पाटील, राजीव गाडगीळ, डॉ. पृथ्वीराज पाटील, डॉ. निलेश खराडे, डॉ. अमर पाटील, डॉ. गणेश चौगुले, जयेश सुर्वे, दिपक स्वामी, राहुल लांडगे, प्रफुल्ल जाधव, सुभाष सूर्यवंशी, अजय मराठे, सचिन स्वामी यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. राधेय सेवा फाउंडेशनने आयोजित केलेल्या या स्पधार्ना विविध संघटना व संस्थानी सहकार्य केले. डी केथलॉन या स्पोर्ट्स ब्रँड ने लकी ड्रॉ मध्ये चार सायकली व इतर बक्षिसे स्पर्धकांना दिली तसेच सरगम मोबाईल शॉपीतर्फे विजय त्यांना स्मार्ट वॉच देण्यात आली.
स्पधेर्चा निकाल असा :
21 किमी (पुरूष) : सोमनाथ ऐवळे (प्रथम), सूरज कदम (द्वितीय), मनोहर तांबे (तृतीय). 10 किमी : (मुली) सन्मई शिंदे (प्रथम), मोहिनी इसापुरे (द्वितीय), सारा जाधव (तृतीय). 10 किमी (पुरूष) : अभिजित हजारे (प्रथम), राज कुंभार (द्वितीय), किरण विचारे (तृतीय). 3 किमी (मुली) : स्नेहल खरात (प्रथम), तनुजा सोळांकुरकर (द्वितीय), स्वरांजली सूर्यवंशी (तृतीय). 3 किमी (मुले) : गौरव माने (प्रथम), हर्षवर्धन पाटील (द्वितीय), यश थोरात (तृतीय).
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.