Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बिहारच्या 'प्रिन्स'चा ताबा कधी? रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरण

बिहारच्या 'प्रिन्स'चा ताबा कधी?
रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरण



सांगली : खरा पंचनामा

शहरातील मार्केट यार्ड परिसरात रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरणातील एक संशयित प्रिन्स कुमार सिंग (वय २४, वैशाली, बिहार) हा डेहराडून पोलिसांच्या अटकेत आहे. तेथील दरोड्यात त्याचा सहभाग होता. आता सांगली पोलिस त्याचा ताबा कधी घेणार याकडे लक्ष आहे. 

याप्रकरणी यापुर्वी  मुख्य सुत्रधार सुबोध सिंग ईश्वरप्रसाद सिंग (रा. चिश्तीपूर, जि. नालंदा, बिहार), महंमद शमशाद महंमद मुख्तार (रा. चेरिया, जि. बेगुसराय, बिहार) आणि अंकुरप्रताप रामकुमार सिंग (रा. तारवान, नौबातपूर, जि. पाटणा, बिहार) यांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी सुबोधसिंग आणि मुख्तार हे दोघे पोलिस कोठडीत आहेत.   

सहा महिन्यापुर्वी मार्केट यार्ड परिसरातील रिलायन्स ज्वेल्स दुकानावर नियोजनबद्धरित्या दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी पोलिस असल्याची बतावणी करीत कर्मचाऱ्यांचे हात-पाय बांधून, बंदूकिचा धाक दाखवत पावणे सात कोटींचे दागिने, रोकड घेऊन पलायन केले होते. पोलिस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर अससल्या ठिकाणी दरोडा टाकल्याने याप्रकरणाची राज्यभरात चर्चा झाली. 

त्यानंतर या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार सुबोध सिंग याला अटक केली. त्यानंतर मंहमद मुख्तार याला बिहारमधून अटक केली. पोलिस कोठडीत त्याची कसून चौकशी सुरू आहे. अनेक माहिती तपासात समोर येत आहे. त्या अनुषंगाने पोलिस खात्री करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.