Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हिवाळी अधिवेशन : पहिल्याच दिवशी विरोधकांची गळ्यात संत्र्यांचे हार घालून सरकारविरोधात घोषणाबाजी

हिवाळी अधिवेशन : पहिल्याच दिवशी विरोधकांची गळ्यात संत्र्यांचे हार घालून सरकारविरोधात घोषणाबाजी



नागपूर : खरा पंचनामा

पावसाने हजेरी लावल्यामुळे थंडगार झालेल्या वातावरणात आज गुरूवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण मंत्रिमंडळ व सर्वपक्षीय आमदार सलग २ आठवडे नागपुरात मुक्कामी असणार आहे. यामुळे नागपूरचा राजकीय पारा चांगलाच वाढण्याची शक्यता आहे.

हिवाळी अधिवेशनाकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे. अशात विधानभवन परिसरात विरोधकांकडून आंदोलन करण्यात आले आहे. विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन विरोधक सरकारविरोधात घोषणाबाजी देतांना दिसत आहे. बळीराजा अवकाळीने त्रस्त, सरकार मात्र जाहिरातीत व्यस्त, सरकार सांगते दुष्काळ सदृश्य, कारण सरकार आहे अदृश्य, अशा घोषणा देण्यात आल्या आहे.

शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशी विरोधकांकडून मागणी करण्यात येत आहे. यावेळी अनेक आमदरांनी गळ्यात गळलेल्या संत्र्यांचा हार घातल्याचे पाहायला मिळाले. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान तसेच कापूस सोयाबीनला भाव नाही. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. अश्या स्थितीत द्या. सरकार केवळ पंचनामे करत आहे. आम्हाला घोषणा नकोत तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

दरम्यान, मराठा व धनगर समाजाचे आरक्षणाकडे लक्ष आहे. ओबीसी समाज आपल्या कोट्यातून आरक्षण दिले जाऊ नये म्हणून दक्ष आहे. आरक्षण द्यायचे आहे, कुणाचे कमी करायचे नाही. मग द्यायचे कसे यावर विचारमंथन करताना सरकारचा कस लागणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.