बृजभूषण सिंह यांना मोठा धक्का!
नव्या कुस्ती महासंघाची मान्यता केंद्र सरकारकडून रद्द
नवी दिल्ली : खरा पंचनामा
नव्या कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे सरकारकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातं आहे.
कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष आणि बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांना देखील पदावरुन हटवण्यात आलं आहे.
कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची नियुक्ती झाली होती. त्यामुळे नाराज झालेल्या कुस्तीगीर साक्षी मलिक हिने खेळातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. तर कुस्तीगीर आणि ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया याने आपले पद्म पुरस्कार परत केले होते. वाद वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्याचं सांगण्यात येतंय. नव्याने नियुक्त कुस्ती महासंघाची मान्यताच रद्द करण्यात आलीये.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.