Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत दुचाकी चोरट्यास अटक, ७ गुन्हे उघड अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, शहर पोलिसांची कारवाई

सांगलीत दुचाकी चोरट्यास अटक, ७ गुन्हे उघड
अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, शहर पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

सांगली शहर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या तसेच घरफोडी करणाऱ्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून सात गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्याच्याकडून चोरीचा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली.  

मोहमद अब्दुलगणी शेख (वय २०, रा. शामरावनगर, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शहरातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे निरीक्षक देशमुख यांनी यातील चोरट्यांना पकडण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पथक सांगली शहरात गस्त घालत होते. पथकातील संतोष गळवे यांना शामरावनगर येथील झुलेलाल मंदिराजवळ एक तरूण चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. 

मिळालेल्या माहितीनुसार पथकाने झुलेलाल मंदीर परिसरात सापळा रचला होता. संशयित शेख तेथे आल्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर शहरातील विविध ठिकाणाहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याच्याकडून चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. 

सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, विनायक शिंदे, सचिन शिंदे, श्रीपाद शिंदे, गुंडोपंत दोरकर, गौतम कांबळे, संतोष गळवे, योगेश सटाले, गणेश कांबळे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.