Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिरोळ पोलिसांनी सातारा येथील सराईत गुन्हेगारास पकडले

शिरोळ पोलिसांनी सातारा येथील सराईत गुन्हेगारास पकडले



शिरोळ : खरा पंचनामा

येथील बुवाफन महाराज यांच्या उरुसामध्ये संशयास्पदरित्या फिरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडण्यात शिरोळ पोलिसांना यश आले. उरूसामध्ये चोरीचे साहित्य घेऊन फिरताना तो सापडला.

इंद्रजीत मोहन गुरव (वय ३२, रा. कोंडवे, जि. सातारा) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी रात्री इंद्रजीत हा बुवाफन महाराज मंदिर परिसरात संशयास्पदरित्या फिरत होता. पोलिसांच्या गस्ती पथकाने इंद्रजीतला संशयावरून ताब्यात घेतले असता त्याच्याकडे स्क्रू ड्रायव्हर व ब्लेड मिळून आले.

त्याची कसून चौकशी केली असता त्याच्यावर सातारा, बारामती, पुणे, कोरेगाव आदी २४ ठिकाणी विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याची कसुन चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.