Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या



मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने सोमवारी या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. दरम्यान नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानंतर राज्यातील अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या होण्याची शक्यताही वतर्वली जात आहे. त्यामुळे कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. 

मुंबईतील राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे यांची ठाणे शहरचे पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर ठाणे शहरचे पोलिस आयुक्त जयजित सिंह यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. ऐन हिवाळी अधिवेशन काळात वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने राज्यातील अन्य अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या होण्याचे संकेत मिळत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.