Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बसप प्रमुख मायावतींचा वारसदार ठरला! पुतण्या आकाश आनंद ठरले उत्तराधिकारी

बसप प्रमुख मायावतींचा वारसदार ठरला!
पुतण्या आकाश आनंद ठरले उत्तराधिकारी



लखनऊ : खरा पंचनामा 

बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) प्रमुख मायावती यांनी आज (दि. १०) पक्षाच्या बैठकीत आपला पुतण्या आकाश आनंद यांना उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले. लखनौमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आकाश आनंद यांच्याकडे बीएसपी अध्यक्षपदानंतर पक्षाचे नेते म्हणून पाहिले जात होते. मागील एक वर्षापासून ते पक्षामध्ये सक्रीय होते. आकाश आनंद हे मायावती यांचे धाकटे बंधू आनंद कुमार यांचे पुत्र आहेत. आकाश आनंद यांनी २०१६ मध्ये बसपमध्ये प्रवेश केला. त्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या स्टार प्रचारकांपैकी एक म्हणून देखील सूचीबद्ध केले गेले.

31 वर्षीय आकाश आनंद हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अलवरमध्ये 'स्वाभिमान संकल्प यात्रेत' सहभागी झाले होते. तसेच 2018 मध्ये राजस्थानमध्ये बसपाच्या निवडणूक प्रचारातही ते दिसले होते जिथे बसपने सहा जागा मिळवल्या होत्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.