Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

द्राक्षांना नुकसान भरपाई साठी आ. सुमन पाटील यांचे नागपुरात आंदोलन

द्राक्षांना नुकसान भरपाई साठी आ. सुमन पाटील यांचे नागपुरात आंदोलन



नागपूर : खरा पंचनामा

अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी अडचणीत आलेला आहे. एकट्या सांगली जिल्ह्यातील सुमारे २० हजार हेक्टर पेक्षाही जास्त क्षेत्राचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीपासून शेतकरी आणि द्राक्षशेती वाचविण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी द्यावी. नुकसान झालेल्या शेतक-यांना एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, यासह अनेक मागण्यासाठी आमदार सुमन पाटील यांनी आज नागपूर येथील विधानभवन समोर आंदोलन केले.

मागील चार-पाच वर्ष सातत्याने निसर्गाची अवुकृपा झाल्याने द्राक्ष बागायतदार शेतकरी हावलदिल झाले आहेत. यासह शेतक-यांच्या विविध मुद्द्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विधान भवनाच्या पायऱ्यावरती आमदार सुमन पाटील, आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आंदोलन केले.

सलग तीन वर्षे अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या अर्थिक नुकसानीची भरीव आर्थिक मदत करावी. द्राक्षे घेऊन पळून जाणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कायदा बनवावा. बाग उभी करायला एकरी तीन लाख रुपये खर्च आहे. धुके आले तरी रोग येतो, पाणी कमी पडले तरी अडचण होते, द्राक्ष खूपच नाजूक पीक आहे. द्राक्ष पिकास पीक विमा लागू करताना १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर दरम्यानच्या काळातील पीक विमा लागू करावा.

जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना कर्जाच्या वसुलीसाठी ताकादा लावला जातो. त्यामध्ये शिथिलता द्यावी. नाशिकमध्ये गारपीट झाली. म्हणून सरसकट पंचनामे झाले. या धर्तीवर सांगली जिल्ह्यातही सरसकट पंचनामे झाले पाहिजेत. अशा मागण्या आमदार सुमनताई पाटील यांनी केल्या आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.