Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निवृत्त शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांची ८२ लाखांची अपसंपदा सांगली लाचलुचपत प्रतिबंधककडून विश्रामबागमध्ये गुन्हा दाखल

निवृत्त शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांची ८२ लाखांची अपसंपदा
सांगली लाचलुचपत प्रतिबंधककडून विश्रामबागमध्ये गुन्हा दाखल



सांगली : खरा पंचनामा

सांगली जिल्हा परिषदेकडील तत्कालीन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विष्णू मारूतीराव कांबळे यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या तसेच त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या अपसंपदेची तपासणी केली. त्यामध्ये कांबळे दाम्पत्याच्या नावे ८२ लाख ९९ हजार ९५२ रूपयांची अपसंपदा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्याविरोधात बुधवारी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. 

याप्रकरणी विष्णू मारूतीराव कांबळे (वय ५९), त्यांची पत्नी जयश्री विष्णू कांबळे (दोघेही रा. बारबोले प्लॉट, शिवाजीनगर, बार्शी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक विनायक भिलारे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भ्रष्टाचार अधिनियम १९८८ चे कलम १३(१) (ई), १३ (२), सहकलम भारतीय दंड संहिता कलम १०९ तसेच सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनिय सन २०१८ चे कलम १३(१) (ब), १३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विष्णू कांबळे हे सांगलीतील जिल्हा परिषदेत माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. १६ जून १९८६ ते दि. ६ मे २०२२ या कालावधीत कांबळे यांनी भ्रष्ट आणि गैरमार्गाने जमवलेल्या तसेच कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अपसंपदेचे परीक्षण केले. त्यामध्ये त्यांनी ८२ लाख ९९ हजार ९५२ रूपयांची अपसंपदा जमवल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बुधवारी कांबळे दाम्पत्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.