बचाव पक्षातर्फे ॲड. विकास पाटील-शिरगांवकर याची कायदेशीर मुद्यावर जोरदार युक्तिवाद
अनिकेत कोथळे खून प्रकरण
सांगली : खरा पंचनामा
अनिकेत कोथळे खूनप्रकरणी नुकतीच सांगलीत सुनावणी झाली. यावेळी बचाव पक्षातर्फे ॲड. विकास पाटील-शिरगांवकर याची कायदेशीर मुद्यावर जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी कोल्हापूर सीआयडीचे अधिक्षक. नरेंद्र गायकवाड यांनी कारागृहात जाऊन अमोल भंडारेचे टिपण नोंदविले असून त्यावर त्यांची असलेली सही त्यांच्या दुसऱ्या सहीबरोबर जुळणारी नाही. पोलिस निरीक्षक बागवडे यांच्या सह्या तसेच पाच पंचनाम्यावर असलेल्या त्याच पंचांच्या सह्या त्यांची नावाक्षरे, तारखा लिहण्याचे अक्षर वेगवेगळ्या असून त्या सर्व एकमेकांबरोबर जुळणाऱ्या नाहीच हे स्पष्ट दिसत आहे, असे ॲड. विकास पाटील-शिरगांवकर न्यायालयात म्हणाले.
आरोपी युवराज कामटे याचेकडे गु र. क्र. २३८/१०१७ चा चोरीचा गुन्ह्याचा तपास त्याचेकडे नव्हता व त्या संदर्भातले कागदपत्रावंर युवराज कामटे यांच्या सह्या जुळणाऱ्या नाहीत असा अहवाल समोर आहे. पण त्या गुन्ह्याचे कागदपत्रे दडविण्यात आले आहेत. कोगनोळी टोल नाक्यांचे सीसीटीव्ही फुटेज दडविण्यात आले आहे. तसेच आरोपी कामटे हा त्याची सही तपासणीसाठी पाठविण्यासाठी आजही न्यायालयासमोर सही देणेस तयार आहे. संबधित पंच, अधिकारी यांच्या न जुळणाऱ्या सह्या ह्या पुन्हा घेऊन त्याही तपासणीसाठी हस्ताक्षर तज्ञांकडून तपासणीसाठी पुरावा कायदा क. ७४ प्रमाणे पाठविणे आवश्यक आहे, असा मुद्दाही ॲड. विकास पाटील-शिरगांवकर यांनी यावेळी मांडला.
अनिकेत कोथळे याचे वडीलांचा डीएनए तपासणी अहवाल तपास यंचत्रणने हजर करावा असा अर्ज क्र. ३९६ चे अर्जावर तपास यंत्रणेने तो अहवाल एफएसएलकडून आलेला नाही, असे लेखी म्हणने दिले असून त्यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा सही आहे. सदर अर्जावर युक्तवाद करताना ॲड. विकास पाटील शिरगांवकर यांनी मुद्दा मांडला की, तो अहवाल जुळत नाही म्हणून तो दडविला आहे. पण जर तो जुळत असता तर सरकार पक्षने वाजत गाजत सदरकामी दाखल केला असता, पण तो दाखल केला नाही. याचे कारण तो मयत व्यक्तींचा पिता म्हणून जुळणारा नाही हे आहे.
सदरकामी मुंबई उच्च न्यायालयाने सदर काम १७/१०/२०२३ पर्यत पुर्ण करावे असे आदेश दि १७/१०/२०२२ रोजी दिला असून सदरकामी सरकार पक्ष पुरावा सादर करणेस मुदत मागत आले आहेत. म्हणून त्या आदेशास अधिन राहूनह आ. क्र. १, ५ तर्फे जामीन अर्ज दाखल केला असून सरकार पक्षाने युक्तीवाद करणेस मुदत मागीतली आहे. याबाबत पुढील सुनावणी दि. १५ डिसेंबर रोजी होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.