Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS मधून नियुक्त्या मिळण्याचा मार्ग मोकळा 408 उमेदवारांना मोठा दिलासा

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS मधून नियुक्त्या मिळण्याचा मार्ग मोकळा
408 उमेदवारांना मोठा दिलासा



मुंबई : खरा पंचनामा

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आता आर्थिक मागास वर्गातून म्हणजचे EWS मधून नियुक्त्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण SEBC चं आरक्षण रद्द झाल्यानंतर MAT नं रोखलेल्या पदांची भरता आता करता येईल. यामुळे 408 उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. जवळपास 2019 पासून या नियुक्त्या रखडल्या होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, वनसेवा, कर सहाय्यक, पीएसआय, कनिष्ठ अभियंता, इतर पदांसाठी या नियुक्त्या करण्यात येणार आहे. यामुळे 3 हजार 485 उमेदवारांना नियुक्त्या मिळणार आहेत.

एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणाचे प्रकरण हे न्यायालायात प्रलिंबित होते. या प्रवर्गातून या विद्यार्थ्यांना दहा टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आलीये. परंतु हे प्रकरण न्यायालयामध्ये असल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. पण आता हायकोर्टाने या नियुक्त्या EWS मधून करण्याचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थातच एमपीएसच्या 2020 पासूनच्या नियुक्त्या या रखडल्या होत्या. या परीक्षेमध्ये निवड होऊन अनेक महिने उलटले तरीही विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळाल्या नव्हत्या. त्यासाठी विद्यार्थ्यांनी उपोषणाचा देखील पवित्रा घेतला होता. EWS प्रकरण न्यायालयात निलंबित होतं, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नियुक्त्यांना देखील ब्रेक लागला होता. पण आता या नियुक्त्या होणार आहेत. त्यामुळे या नियुक्त्या कधीपर्यंत होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.